अचानकच्या नोकरी गमावण्यामुळे आर्थिक चिंता वाढते, त्यासाठी पैशाची तजवीज करणे गरजेची आहे.
नोकरी गमावण्याची भीती: अचानकच्या नोकरी गमावण्यामुळे आर्थिक चिंता वाढते, त्यासाठी पैशाची तजवीज करणे गरजेची आहे.
आपत्कालीन निधीचे महत्त्व: हा निधी आर्थिक संकट काळात संरक्षण देतो. तसंच मानसिक ताण निर्माण होणार नाही याची काळजी देखील घेतो.
किती शिल्लक ठेवावी?: जर दोघे कमावणारे असले तर किमान ३ ते ६ महिन्यांच्या खर्चाची तयारी करून ठेवा; एकटा कमवणारा व्यक्ती असेल तर ९ ते १२ महिन्यांचां खर्च निघेल इतकी रक्कम ठेवा.
तुरळक रक्कमेने सुरुवात करा: मोठी रक्कम वाचवू न शकल्यास, कमी रकमेने उदाहरणार्थ महिन्याला १ हजार रूपयाने सुरूवात करा.
बचत: बचतीचे पैसे आपल्या वेगळ्या खात्यात आपोआप ट्रान्सफर व्हावेत, यासाठी ऑटोमेशन वापरा.
अनावश्यक खर्च कमी करा: वापरात नसलेल्या OTT, अनावश्यक खरेदी, खाण्या-पिण्याचा खर्च कमी करा.
योग्य जागी गुंतवणूक: निधी सहज उपलब्ध असेल, अशा ठिकाणी उदाहरणार्थ लिक्विड म्युच्युअल फंड, उच्च व्याजदराची बचत खाते इथे ठेवावा.
दीर्घकालीन लॉक इन टाळा: फिक्स्ड डिपॉझिट किंवा शेअर मार्केटसारखी दीर्घकालीन गुंतवणूक टाळा.
नियमित पुनरावलोकन: मासिक खर्चात बदल झाला तर, निधीचे उद्दिष्ट पुन्हा ठरवा आणि यथासांग वाढवा.
निधी वापरल्यास लगेच भरा: आपत्कालीन निधी वापरल्यानंतर शक्य तितक्या लवकर तो पुनः भरून काढा.