तुम्ही राेज ब्रेड खाताय? मग हे वाचाच!

सकाळी घाईगडबडीत पटकन हाेणारा नाश्ता म्हणजे ब्रेड - बटर, सॅण्डवीच असं तुम्हालाही वाटतं का? तुम्ही राेज ब्रेड खात असाल, तर हे नक्की वाचा. 

भारतीयांच्या राेजच्या आहारात पहिल्यापासून ब्रेडचा समावेश नव्हता. पण, गेल्या काही वर्षांत ब्रेड भारतीयांच्या आहारात काॅमन झाला आहे. 

पाेळीला पर्याय म्हणून किंवा झटपटा नाश्त्यासाठी ब्रेडचा पर्याय निवडला जाताे. पण, असे करणे आराेग्यास घातक आहे. 

ब्रेड तयार करताना यीस्ट आणि रिफाइंड पीठाचा वापर केला जाताे. यामुळे पाेटात गॅस हाेणे, पाेट फुगणे असे त्रास जाणवतात. 

व्हाईट ब्रेडमधील कार्ब्सचे रूपांतर पटकन शुगरमध्ये हाेते. ही प्रक्रिया सातत्याने झाल्यास डायबिटीजचा धाेका वाढताे. 

ब्रेडमध्ये जास्त कार्बाेहाड्रेट्स असल्याने फॅट स्टाेरेज वाढते. कमी फायबर असते. यामुळे वजन पटकन वाढू शकते. 

ब्रेडचे पचन लवकर हाेते. त्यामुळे जास्त काळ पाेट भरलेले राहात नाही. भूक लागते. नुसता ब्रेड खाल्यास थकवा जास्त जाणवताे. 

ब्रेडमध्ये व्हिटॅमिन्स, फायबर, मिनरल्स नसतात. त्यामुळे ब्रेड खाऊन शरीराला पोषण मिळत नाही. 

ब्रेडला पाेळी, भाकरी हे उत्तम पर्याय आहेत. ब्रेड राेजच्या राेज खाण्यापेक्षा कधीतरी खाला तर शरीराला घातक ठरणार नाही. 

Click Here