बाळ जन्माला आल्यावर त्याच्या शरीरात असणाऱ्या हाडांची संख्या प्राैढ हाेताना कमी हाेत जाते, हे तुम्हाला माहिती आहे का?
बाळ जन्माला आलं की त्याच्या शरीरात तब्बल ३०० हाडं असतात. या हाडांची संख्या पुढे जाऊन कमी हाेते.
मोठ्या माणसाच्या शरीरात फक्त २०६ हाडं असतात. कारण बाळाची हाडं लहान आणि वेगळी असतात. वाढताना ती एकमेकांशी जाेडली जातात.
बाळांची हाडं लवचिक आणि नाजूक असतात. बाळ माेठं हाेताना हाडं जाेडली जाऊन मजबूत बनतात. शरीराला शक्ती देतात.
माणसाच्या पायामध्ये २६ हाडं असतात. चालणे, धावणे, उड्या मारणे सगळं या हाडांवर अवलंबून असतं.
हातात २७ हाडं असतात. लिहीणं, खाणं, खेळणं, वस्तू पकडणं या सगळ्या क्रिया हाताच्या हाडांमुळे सहज करता येतात.
कानातलं Stapes हाड फक्त ३ मिमीची असतात. इतके छोटं असूनही ऐकण्याचं काम करतं.
आपल्या मांडीतलं Femur हाडं शरीराचे संपूर्ण वजन सांभाळते. म्हणून या हाडाला ‘strength bone’ म्हणतात.
शरीर चांगले राहण्यासाठी हाडं महत्त्वाची आहेत. कॅल्शियमयुक्त आहार, नियमित व्यायाम आणि सूर्यप्रकाश हे हाडांसाठी महत्त्वाचे आहेत.