कोण आहे हा गायक? जाणून घ्या...
कैलाश खेर बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक आहेत.
आपल्या सुरेल आवाजाने त्यांनी लाखो लोकांच्या मनात हक्काची जागा मिळवली आहे.
गाण्याबरोबरच कैलाश खेर हे आपल्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात.
त्यांच्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं प्रत्येक गाणं मनाला भिडतं. त्यामुळे आज ते इंडस्ट्रीतील टॉप १० गायकांपैकी एक आहेत.
'तेरी दीवानी', 'सैंया','चांद सिफारिश', या रब्बा', यांसारखी अनेक सुपरहिट गाणी त्यांनी इंडस्ट्रीला दिली आहेत.
परंतु, त्यांचा हा प्रवास फार काही सोपा नव्हता. एका मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या जीवनाविषयी अनेक खुलासे केले होते.
"मी प्रत्येक गोष्टीत अपयशी ठरत होतो. त्यामुळे एक दिवस या सगळ्याला कंटाळून आत्महत्या करायचा प्रयत्न केला, घर सोडलं होतं." असा खुलासा त्यांनी केला होता.
सध्याच्या घडीला कैलाश खेर हे एका गाण्यासाठी जवळपास १५-२० लाख रुपये मानधन घेतात.