बॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय जोड्या आहेत फक्त सिनेमांमध्येच नाही, तर खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे चांगले मित्रमैत्रिणी आहेत.
बॉलिवूडमध्ये अनेक लोकप्रिय जोड्या आहेत फक्त सिनेमांमध्येच नाही, तर खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे चांगले मित्रमैत्रिणी आहेत.
अशा काही खास जोड्यांबद्दल जाणून घेऊया, ज्या शाळेपासूनच एकमेकांचे खास जिगरी दोस्त आहेत.
अर्जुन कपूर व सोनाक्षी सिंन्हा हे दोघेही मुंबईच्या आर्य विद्या मंदिर शाळेत एकत्रितच शिकले आहेत.
सारा अली खान व अनन्या पांडे या दोघींनी मुंबईच्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कुलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. अनन्या व सारा शाळेपासूनच एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत.
अमिताभ बच्चन यांनी नातं नव्या नवेली नंदा व शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांनी एकत्रित सेव्हन ओक्स स्कुलमधून आपले शिक्षण पूर्ण केले.
अभिनेत्री अनुष्का शर्मा व क्रिकेटर धोनी याची पत्नी साक्षी एकाच शाळेत शिकत होत्या. त्या आजही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत.
श्रद्धा कपूर व टायगर श्रॉफ यांनी देखील एकाच शाळेतून शिक्षण पूर्ण केले. आजही त्यांच्यातील मैत्रीचे नाते अगदी घट्ट आहे.
सलमान व आमिर खान यांनी मुंबईतील St Anne’s School, Pali Hill या शाळेतून एकत्रित शिक्षण घेतले.
ऋतिक रोशन व उदय चोप्रा शाळेपासून एकमेकांचे मित्र आहेत, त्यांनी ‘Dhoom 2’ चित्रपटातही एकत्र काम केले आहे.