६११ तास, ३४ कारागिरांच्या मेहनतीने बनलाय खास गाऊन
फ्रान्समधील कान्स शहरात झालेल्या या वर्षीच्या कान्स चित्रपट महोत्सवात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी डेब्यू केला.
टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेन देखील पहिल्यांदाच कान्सच्या रेड कार्पेटवर दिसली. तिचा खास लूकही समोर आला.
वयाच्या ७व्या वर्षी अनुष्काने 'यहान मैं घर घर खेली' या शोमधून सुरुवात केली, 'बालवीर'मुळे ती घराघरात पोहोचली.
बालकलाकार म्हणून ओळख मिळवणारी अनुष्काने वयाच्या २२ व्या वर्षी, कान्स फिल्म फेस्टिवलचा डेब्यू केलाय.
अनुष्का रेड कार्पेटवर तिच्या खास 'मरमेड' ड्रेसमुळे चर्चेचा विषय बनली आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
तिने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये डचेस कुमारीच्या कलेक्शनमधील डिझायनर कस्टम-मेड गाऊन घालून डेब्यू केला आहे.
अनुष्का सेनचा गाऊन 'ट्री ऑफ लाईफ'पासून प्रेरित आहे. त्यात जरदोझी, आरी, रेशम आणि क्रिस्टल थ्रेडवर्कचा मिलाफ आहे.
हा गाऊन तयार करण्यासाठी पारंपारिक भारतीय भरतकाम कलेचा उत्तम पद्धतीने वापर केला गेला आहे.
हा गाऊन बनवण्यासाठी तब्बल ६११ तास म्हणजेच सुमारे ४ आठवड्यांपेक्षाही जास्त कालावधी लागला आहे.
स्ट्रॅपलेस रॉयल गाऊनचा लूक उठून दिसावा यासाठी तिने न्यूड मेकअप लूकसह कमीत कमी ज्वेलरी वापरली आहे.
२२ वर्षांच्या अनुष्काचा कान्स फेस्टिवल डेब्यू लूक पाहून चाहते सोशल मीडियावर तिचे कौतुक करत आहेत.