उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे काही फोटो शेअर केले आहेत. पण तिचा चेहरा मात्र वेगळाच दिसत आहे.
उर्मिला मातोंडकर या मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलिवूड गाजवलं. जेवढी तिच्या अभिनयाची चर्चा तेवढीच तिच्या सौंदर्याचीही.
९०च्या दशकात कित्येकांना सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रींपैकी उर्मिला एक. आजही ती तितकीच सुंदर दिसते.
मात्र आता उर्मिलाचे काही फोटो समोर आले आहेत. जे पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. पण तिचा चेहरा मात्र वेगळाच दिसत आहे.
तिचे हे फोटो पाहून तिने सर्जरी केली की काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
उर्मिलाच्या या फोटोंवर चाहत्यांनी तशा कमेंटही केल्या आहेत.