अभिनेत्री तमन्ना भाटियाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.
तमन्ना भाटिया तिच्या नवनवीन चित्रपटांमुळे आणि वैयक्तिक आयुष्यामुळे सतत चर्चेत येत असते.
याशिवाय अभिनेत्री तिच्या फिटनेससाठीसुद्धा ओळखली जाते.
तमन्ना भाटिया सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. तिचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे.
नुकतंच तमन्नाने नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्री अतिशय सुंदर दिसत आहे.
तिच्या लूकवर चाहते घायाळ झाले आहेत. या लूकमध्ये तमन्ना अतिशय सिंपल पण तितकीच स्टनिंग दिसत आहे.