बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे ९० च्या दशकातील लोकप्रिय नायिकांपैकी एक होती.
सोनालीने बऱ्याच सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून चाहत्यांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला.
आजही तिची क्रेझ कमी झालेली नाही. प्रेक्षक तिचे सिनेमे आजही तितक्याच आवडीने पाहतात.
सध्या सोनाली सोशल मीडियावरील तिच्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
सोनाली बेंद्रेने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
लाल रंगाच्या साडीत सोनाली फार सुंदर दिसते आहे.
"ऑल सेट टू होस्ट समथिंग फन ...", असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.