अभिनेत्रीने गुलाबी रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलं आहे.
मराठमोळ्या सोनाली बेंद्रेने बॉलिवूड गाजवलं. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
ऐन पन्नाशीतही सोनालीचं सौंदर्य चाहत्यांना वेड लावतं.
नुकतंच अभिनेत्रीने गुलाबी रंगाच्या साडीत खास फोटोशूट केलं आहे.
याचे सुंदर फोटो सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.
अभिनेत्रीचे हे मोहक फोटो पाहून चाहतेही फोटोंच्या प्रेमात पडले आहेत.
सोनाली लवकरच 'पती, पत्नी और पंगा' या नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.