अभिनेत्री सोनाली बेंद्रे ही ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
आपल्या सहज सुंदर अभिनयाने व सौंदर्याने तिने चाहत्यांची मनं जिंकली.
आजही तिची क्रेझ कमी झालेली नाही. सोनालीचे चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात.
नुकतेच अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
गडद पिवळ्या रंगाची साडी नेसून सोनालीने चाहत्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे.
कानात सुंदर झुमके आणि हातात कडा परिधान करुन सोनालीने लूक पूर्ण केला आहे.
पिवळ्या रंगाच्या साडीत सोनालीचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे.
अभिनेत्रीच्या या व्हायरल फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळतेय.