कॉफी शॉपमध्ये काम करणारी 'ती' आज आहे स्टार!


कोण आहे 'ही' अभिनेत्री? जाणून घ्या...

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी स्वत:च्या अभिनय शैलीच्या जोरावर  इंडस्ट्रीत नाव कमावलं आहे. 

मात्र, अशी एक अभिनेत्री आहे जी स्टारकीड असूनही चक्क कॉफी शॉपमध्ये काम करायची. 

महिन्याच्या खर्चासाठी तिला हे काम करावं लागायचं. ही अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर.

श्रद्धा कपूरने आपल्या सहज सुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. 

श्रद्धाने तिच्या आजवरच्या फिल्मी कारकीर्दीत बऱ्याच सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

परंतु, श्रद्धा अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी काही वर्ष बोस्टनमध्ये शिक्षणासाठी होती. 

तिथे ती कॉफी शॉपमध्ये वेटर म्हणून काम करायची.

सध्याच्या घडीला श्रद्धा कपूर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीची नायिका आहे. 

Click Here