कोण आहे ही अभिनेत्री?
शिल्पा शिरोडकरने बॉलिवूडमधील एक काळ गाजवला होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
शिल्पाने तिच्या फिल्मी कारकिर्दीत 'भ्रष्टाचार', 'योद्धा', 'हम', 'आँखे', 'गोपी किशन'सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.
मात्र, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही अभिनेत्री इंडस्ट्रीतून गायब झाली.
त्यानंतर जवळपास १३ वर्षांनंतर ती अभिनय क्षेत्राकडे परतली.तिने 'एक मुठ्ठी आसमान' या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती.
परंतु, तुम्हाला माहिती आहे का, लग्नानंतर शिल्पाने परदेशात सलूनमध्ये हेअर ड्रेसरचं काम केलं होतं.
स्वत: ला व्यग्र ठेवण्यासाठी अभिनेत्रीने हेअर ड्रेसिंग शिकण्यावर भर दिला होता.
लग्नानंतर तिने न्यूझीलंडमध्ये सलूनमध्ये दोन महिने हेअर ड्रेसरचं काम केलं होतं.
एका मुलाखतीत शिल्पा शिरोडकरने याबद्दल खुलासा केला होता.