राणी मुखर्जीचा चाहता वर्गही मोठा आहे. नुकतंच राणीने खास फोटोशूट केलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने तिच्या अभिनयाने ९०चं दशक गाजवलं. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.
यामध्ये तिने रेट्रो लूक केल्याचं दिसत आहे. काळ्या रंगाच्या साडीत तिने ब्लॅक अँड व्हाइट फोटोशूट केलं आहे.
गळ्यात मोत्यांचे दागिने आणि रेट्रो आय मेकअप लूक केला आहे. तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
दरम्यान, राणीने २०१४ मध्ये निर्माता, दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत लग्न केलं.
त्यांना एक मुलगी आहे. जिचं नाव त्यांनी आदिरा असं ठेवलं आहे.