बार्बी गर्ल! नितांशीचा ग्लॅमरस लूक


'लापता लेडीज' या चित्रपटातून नितांशी गोयल हे नाव लोकप्रिय झालं. 

किरण राव दिग्दर्शित या चित्रपटात फूलकुमारीची भूमिका साकारुन तिने चाहत्यांची मनं जिंकली.

अलिकडेच अभिनेत्री 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मुळे प्रचंड चर्चेत आली होती.

दरम्यान, नुकतेच नितांशीने सोशल मीडियावर तिचे खास फोटो शेअर केले. ज्याची सगळीकडे चर्चा होत आहे. 

या लूकसाठी नितांशीने पिवळ्या रंगाचा डिझायनर ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.

तसेच या ड्रेसवर तिने सोनेरी रंगाचे कानातले, केसात फुले आणि बोटात सुंदर अंगठी घातली आहे.

या लूकमध्ये नितांशी अगदी परीसारखीच गोड दिसते आहे.

Click Here