बॅकग्राउंड डान्सर आता गाजवतेय बॉलिवूड!

बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी खूप संघर्ष करून नाव कमावलं. 

त्यापैकी एक नाव म्हणजे अभिनेत्री मौनी रॉय.

मौनी रॉय हिंदी सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.

मौनीने फक्त छोट्या पडद्यावरच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. 

बॅकग्राउंड डान्सर ते बॉलिवूडपर्यंतचा असा लांबचा पल्ला तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर पार केलाय. 

मौनी पहिल्यांदा 'रन' चित्रपटातील एका गाण्यात बॅकग्राउंड डान्सर म्हणून दिसली होती.

यानंतर तिने एकता कपूरच्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.

इतकंच नाही तर मौनी रॉयने मोठ्या पडद्यावरही आपलं अभिनय कौशल्य दाखवलं.

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात ती खलनायिकेच्या भूमिकेत दिसली होती.

Click Here