मानुषी छिल्लर ही हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
२०१७ साली मानुषीने 'मिस वर्ल्ड'च्या मुकुटावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने बॉलिवूडची वाट धरली.
सध्या मानुषी तिचा आगामी चित्रपट 'मालिक'मुळे चर्चेत आहे.
या चित्रपटात ती राजकुमार रावसोबत पहिल्यांदा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
अशातच सोशल मीडियावर अभिनेत्रीने 'मालिक' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेल्या खास लूकची चर्चा आहे.
मानुषी या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसते आहे. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.