जान्हवी कपूर लवकरच 'परम सुंदरी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरने आईच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
जान्हवी कपूर लवकरच 'परम सुंदरी' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात ती साऊथ लूकमध्ये दिसणार आहे.
या सिनेमात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
जान्हवीने नुकतंच साऊथ लूकमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसून दागिने घालून साऊथ लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.
जान्हवीचा हा साऊथ लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. तिच्या या फोटोंवरुन नजन हटत नाहीये.