जान्हवी कपूर ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
सध्या अभिनेत्री तिचा आगामी चित्रपट 'परमसुंदरी'मुळे प्रसिद्धीझोतात आली आहे.
या चित्रपटात जान्हवी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. निसर्गरम्य अशा केरळमध्ये या सिनेमाचं शूटिंग झालं आहे.
दरम्यान, नुकतेच जान्हवी कपूरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर बोटीत बसून नदीत फिरताना दिसत आहे.
अभिनेत्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
जान्हवीच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.