अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे.
अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून जॅकलिनने इंडस्ट्रीत तिची ओळख निर्माण केली.
जॅकलिन कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.
सध्या अभिनेत्री तिच्या आगामी 'हाऊसफुल-५' या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली आहे.
दरम्यान, जॅकलिन तिच्या फॅशनसेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
अलिकडेच तिने 'हाऊसफुल-५' च्या ट्रेलर लाँचसाठी खास लूक केला होता. त्यादरम्यानचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
जॅकलिनचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.