सुंदर- तरुण दिसण्यासाठी 'या' अभिनेत्रीने चक्क २९ सर्जरी करून घेतल्या?
अधिक सुंदर दिसण्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी नेहमीच स्वत:च्या चेहऱ्याच्या वेगवेगळ्या सर्जरी करून घेतात. त्यात आता काही नवे नाही..
पण भारतातली आजवरची सगळ्यात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने १, २ नाही तर तब्बल २९ सर्जरी करून तिचं सौंदर्य टिकवून ठेवल्याचं बोललं जातं.
ती अभिनेत्री म्हणजेच श्रीदेवी. तिच्या तारखा मिळविण्यासाठी कित्येक नामवंत दिग्दर्शकांना, अभिनेत्यांनाही वाट पाहावी लागायची.
८० आणि ९० च्या दशकांत तिने खरोखरच भारतीय चित्रपट सृष्टीवर राज्य केलं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
श्रीदेवीने एका नंतर एक या पद्धतीने जवळपास २९ ऑपरेशन्स करून तिचं सौंदर्य आणखी खुलवलं होतं, असं म्हणतात.
लेजर स्किन सर्जरी, सिलिकॉन ब्रेस्ट ट्रीटमेंट, फेस लिफ्ट, लिप सर्जरी अशा अनेक सर्जरी तिने केल्या होत्या असं बोललं जातं.
करोडाे लोकांच्या मनावर राज्य करणारी ही गोड अभिनेत्री २०१८ साली मात्र तिच्या असंख्य चाहत्यांना निरोप घेऊन कायमची काळाच्या पडद्याआड निघून गेली.