लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीने धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा लूक रिक्रिएट केला आहे.
याचे फोटो अभिनेत्रीने शेअर केले आहेत. पण, या फोटोंमध्ये तिला ओळखणंही कठीण झालं आहे.
फोटोत दिसणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून दिशा पटानी आहे. दिशाने माधुरी दीक्षितसारखा लूक केला आहे.
या फोटोंमध्ये दिशाने माधुरीसारखा केशरी रंगाचा लेहेंगा परिधान केल्याचं दिसत आहे.
त्याबरोबरच दिशाचा बोल्डनेसही फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
दिशाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
तुम्हाला दिशा पटानीचा हा लूक कसा वाटला?