दिया मिर्झा ही हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेली अभिनेत्री आहे.
आपल्या अदाकारिने तसेच अभिनयाने दियाने प्रेक्षकांची मनं जिंकली.
'रहना है तेरे दिल मैं' या चित्रपटातून दिया मिर्झा प्रसिद्धीझोतात आली.
अभिनयाबरोबरच तिच्या सुंदर दिसण्याचीही नेहमी चर्चा होत असते.
वयाची चाळीशी ओलांडली तरी दियाच्या फिटनेसची आणि तिच्या तजेलदार त्वचेची नेहमी स्तुती होते.
नुकतेच तिने काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले असून हे फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान करुन अभिनेत्रीने अप्रतिम फोटोशूट केलं आहे.
दिया मिर्झाचे हे फोटो पाहून चाहते देखील घायाळ झाले आहेत.