चित्रांगदा सिंग ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'हजारो ख्वाईशें ऐसी' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
चित्रांगदाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी तिने दिल्लीमध्ये मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली होती.
परंतु, तिचा हा प्रवास फार काही सोपा नव्हता. असंख्य अडचणींना ती सामोरी गेली आहे. आज ती स्टार अभिनेत्री आहे.
करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिला सावळ्या रंगामुळे अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला.
याचा खुलासा अभिनेत्रीने स्वत: एका मुलाखतीमध्ये केला होता.