'तेरे नाम'मधील निर्जला आता दिसते फारच सुंदर, पाहा फोटो
'तेरे नाम' हा बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
२००३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात सलमान खान आणि भूमिका चावला मुख्य भूमिकेत होते.
या चित्रपटातून अभिनेत्री भूमिका चावलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
'तेरे नाम' मध्ये तिने साकारलेली निर्जला सिनेरसिकांना प्रचंड भावली.
सध्या लाईमलाईटपासून दूर असलेली ही अभिनेत्री आता कशी दिसते? याबद्दल चाहत्यांना उत्सुकता होती.
नुकतेच भूमिका चावलाने सोशल मीडियावर तिचे साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
'तेरे नाम' मधील साधी, सोज्वळ निर्जला खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर दिसते.
अभिनेत्रीचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.