सध्या मनोरंजनविश्वात 'रामायण' सिनेमाची अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे.
नमित मल्होत्रा यांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे.
या चित्रपटात रणबीर कपूर श्रीरामाची भूमिका साकारणार आहे तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत आहे.
याशिवाय साऊथ स्टार यश यामध्ये रावणाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
नुकतीच या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. त्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता वाढली आहे.
तब्बल ३ मिनिटं ३ सेकंदांचा अंगावर काटा आणणारा हा टीझर डोळ्यांचं पारणं फेडणारा आहे.
८३५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, साई पल्लवीसह सनी देओल, यश, रवी दुबे, लारा दत्ता, रकुल प्रीत, अरुण गोविल अशी तगडी स्टारकास्ट आहे.
या बहुचर्चित चित्रपटाचा पहिला भाग पुढील वर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे.