पडद्यावर यशस्वी ठरलेले अनेक कलाकार वैवाहिक जीवनात मात्र अपयशी ठरल्याचं दिसून येतं.
सध्याच्या काळात कलाकारांचं लग्न तुटणं, घटस्फोट होणं ही सामान्य बाब बनली आहे.
परंतु, तुम्हाला माहितीये का? हिंदी सिनेसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्याचा त्याच्या पाळीव श्वानामुळे घटस्फोट झाला होता.
श्वानांवरील असलेल्या प्रेमामुळे घटस्फोट झालेल्या या अभिनेत्याचं नाव आहे अरुणोदय सिंह.
अरुणोदय सिंगने २०१६ मध्ये त्याची कॅनडियन गर्लफ्रेंड ली हिल्टनसोबत लग्नगाठ बांधली.
लग्नानंतर काही महिन्यांतच त्यांच्यामध्ये खटके उडू लागले. याचं कारण त्यांच्या घरातील श्वान ठरु लागला.
अरुणोदयची पत्नी ली एल्टनला श्वानांच्या आवाजाचा त्रास सहन न झाल्याने त्यांच्यामधील तणाव वाढला.
पती-पत्नीमधील वाद वाढून अखेर २०१९ मध्ये या दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.
अरुणोदय सिंगने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.