मानवाच्या शरीरात हाेणारे बदल, शरीर स्वतः गाेष्टी कशा मेंटेन करताे, हे तुम्हाला माहिती आहे का?
मानवाचं शरीर साधारण ३७°C (९८.६°F) इतकं तापमान कायम ठेवतं, शरीर हे असं का करतं, कशामुळे हाेते हे तुम्हाला माहिती आहे का?
आपल्या शरीरासाठी सर्वात सुरक्षित आणि कार्यक्षम पातळी मेंटेन करण्यासाठी हे याेग्य तापमान असल्यामुळे निवडण्यात आले आहे.
३७°C ला आपल्या शरीरातील एन्झाइम्स उत्तमरीत्या काम करतात. हे एन्झाइम्स अन्न पचवणं, ऊर्जा देणं आणि मेंदू चालवणं यासाठी जबाबदार आहेत.
तापमान फार कमी झालं (hypothermia) तर पेशींचं काम मंदावते. शरीर जिवंत राहणं कठीण होतं.
तापमान जास्त झालं (hyperthermia) तर प्रोटिन्स आणि एन्झाइम्स विघटू लागतात. म्हणूनच जास्त ताप धोकादायक असतो.
शरीरातला hypothalamus हा मेंदूचा छोटासा भाग थर्मोस्टॅट सारखा काम करतो. तो सतत शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतो.
थंडीत आपण थरथर कापतो, उष्णता निर्माण होते. उन्हात घाम येतो, शरीर थंड होतं. हे दोन्ही तंत्र ३७°C संतुलन राखतात.
३७°C एवढंच तापमान नियंत्रित नसतं. झोप, व्यायाम, महिलांमध्ये हार्मोन्स यामुळे थोडंफार तापमानात चढ-उतार होतात.