मानवी शरीरातील स्नायूंचे जग 

मानवी शरीरात ६०० पेक्षा जास्त स्नायू आहेत. प्रत्येक स्नायूचे काम वेगवेगळे असते. यातला शक्तिशाली स्नायू काेणता माहिती आहे.

सर्वात शक्तिशाली स्नायू हा जबड्याचा स्नायू (Masseter) आहे. हा स्नायू जबड्याला बंद ठेवतो आणि चावण्याचं काम करतो.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, मानवी जबड्याने २८० किलोग्रॅम वजन उचलले आहे. जबड्याचा स्नायू इतका ताकदवान असताे. 

निरंतर आणि न थकता काम करणाऱ्या स्नायूचा विचार केला, तर हृदयाचा स्नायू (Cardiac Muscle) सर्वात ताकदवान आहे.

हृदय दररोज सुमारे १ लाख वेळा धडकते. हृदयाचे काम कधीच थांबत नाही.

सर्वात मोठा आणि मजबूत स्नायू म्हणून ग्लुटियस मॅक्सिमस (Gluteus Maximus) ओळखला जातो. हा स्नायू हिप्समध्ये असतो. 

सर्वात लांब स्नायू हा सारटोरिअस (Sartorius) असताे. शरीरातील सर्वात लांब स्नायू मांडीमध्ये असतो.

सर्वात लहान स्नायू हा स्टेपेडियस असताे. हा स्नायू कानात असताे. हा स्नायू आवाज नियंत्रित करतो आणि कानाच्या आतील भागाचे संरक्षण करतो.

पापण्यांचे स्नायू शरीरातील सर्वात वेगवान स्नायू आहेत. पापणी मिटण्याचे काम प्रति सेकंद ५ वेळा होते, जे अतिशय वेगवान असते.

Click Here