शरीराचं आरोग्य राखायचं असेल तर शरीर आतून डिटॉक्स होणं गरजेचं आहे.
शरीर डिटॉक्स करण्यासाठी बाजारात अनेक वेगवेगळे प्रकारचे प्रोडक्ट उपलब्ध आहेत. परंतु, घरगुती पदार्थांनीही तुम्ही शरीर डिटॉक्स करु शकता.
बॉडी डिटॉक्स करण्यासाठी लिंबू सर्वोत्तम पर्याय आहे. लिंबामध्ये सोडिअम, पोटॅशिअम,लोह असे अनेक घटक आहेत. ज्यामुळे शरीरातून विषारी घटक बाहेर टाकले जातात.
आल्याचा वापर करुन तुम्ही बॉडी डिटॉक्स करु शकता. यामुळे पोटाच्या अनेक समस्या सहज दूर होतात. ते वापरण्यासाठी, आले चहात टाकून प्यावे.
कोबी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या वापराने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. यात भरपूर फायबर असते, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते.
नारळाच्या पाण्याच्या सेवनानेही शरीर डिटॉक्स करता येते.