शरीराचं घड्याळ चालतं तरी कसं?

मानवी शरीरात एक अदृश्य घड्याळ सतत चालू असतं. त्यालाच बायोलॉजिकल क्लॉक किंवा सर्केडियन रिदम म्हणतात.

आपल्या मेंदूतल्या हायपोथॅलेमस भागात सुप्राकायस्मॅटिक न्यूक्लिअस (SCN) नावाचं केंद्र हे नियमन करतं.

डोळ्यातून मिळणाऱ्या प्रकाशाच्या सिग्नलवर हे घड्याळ काम करतं. दिवसा उठणं, रात्री झोपणं हे त्यावर अवलंबून असतं.

अंधार पडल्यावर शरीर मेलाटोनिन नावाचा हार्मोन तयार करतं, जो झोप येण्याची प्रक्रिया सुरू करत. 

बायोलॉजिकल क्लॉक आपल्या जेवणाच्या वेळांवर परिणाम करतं. नियमित जेवलं तर पचन सुधारतं, वेळ न पाळल्यास गोंधळ होतो.

सकाळी उठल्यावर शरीरात कॉर्टिसोल जास्त असतो. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. रात्री उशिरा मात्र हा हार्मोन कमी होतो आणि थकवा जाणवतो.

झोप - जागरणाचं घड्याळ विस्कटल्यास मधुमेह, हृदयविकार, लठ्ठपणा यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये प्रवास केल्यावर बायोलॉजिकल क्लॉक गोंधळते. त्यालाच जेट लॅग म्हणतात. 

मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपच्या निळ्या प्रकाशामुळे मेलाटोनिन कमी तयार होते आणि झोप उशिरा येते.

आपल्या शरीराचं घड्याळ निसर्गाशी जाेडलेल आहे. योग्य वेळेवर झोपणं, उठणं आणि जेवणं, हेच खरं आरोग्याचं गुपित आहे.

Click Here