कोणाला घ्यावे लागते ब्लु आधार कार्ड?

आधार कार्ड सगळ्यांकडे असते. पांढऱ्या रंगाचे आधार कार्ड माहिती आहे. मग ब्लु आधार कार्ड म्हणजे काय? हे तुम्हाला माहिती आहे का?

शाळेत प्रवेश घेताना, अन्य सरकारी याेजनांसाठी लहान मुलांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. 

आधार कार्ड नंबर आता सर्व ठिकाणी महत्त्वाचा मानला जाताे. आधार कार्ड काढल्यावर ताे नंबर मिळताे. 

लहान मुलांचे आधार कार्ड असते, त्यालाच ब्लू आधार कार्ड असे म्हटले जाते. मुलांसाठी हे विशेष कार्ड आहे. 

लहान मुलांची वाढ हाेत असते. त्यांच्या हातांचे ठसे बदलतात. यामुळे आधार कार्ड बनवताना त्यांचे ठसे घेऊ शकत नाहीत. 

नवजात शिशुचे आधार कार्ड काढायचे असल्यास, बर्थ डिस्चार्ज सर्टिफिकेट, आई - वडिलांच्या आधारकार्डवरून मुलांचे आधार कार्ड काढता येते. 

लहान मुलांचे आणि प्राैढांच्या आधार कार्डमध्ये फरक असताे. काही महत्त्वाच्या फरकांमुळे दाेन प्रकारचे आधार कार्ड तयार केले जातात. 

ब्लू आधार कार्डमध्ये मुलांच्या बाेटांचे ठसे, डाेळ्यांच्या स्कॅन केलेले नसतात. मुलांची माहिती फक्त या कार्डवर असते. 

मुलांचे वय ५ वर्षे हाेते, तेव्हा ब्लू आधार कार्ड अपडेट करून घ्यावे लागते. सरकारी नियमांनुसार आधार कार्डमध्ये बदल केले जातात. 

Click Here