हायपरटेंशनच्या तीन स्टेज, तुम्ही कुठल्या स्टेजमध्ये आहात...लगेच चेक करा...
आजकाल अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास होत आहे. यामुळे कमी वयातच हार्ट अटॅकही येतात.
ब्लड प्रेशरवर लक्ष दिले नाही तर मृत्यूही होत आहे. अनेकांना वयानुसार किती ब्लड प्रेशर असावे हे देखील माहित नसते.
प्रमाणाच्या बाहेर आकडा गेला की हायपरटेंशन समजले जाते. 120/80 च्या खाली असेल तर सामान्य समजले जाते.
तेच जर का 130-139/80-89 वर गेले की मग हायपरटेंशनची पहिली स्टेज सुरु होते.
ब्लड प्रेशर जर का ≥140/≥90 असेल तर हायपरटेंशनची स्टेज २ असते.
पण हेच जर का >180/>120 च्या वर गेले तर मात्र हार्ट अॅटॅकचा धोका वाढलेला असतो. यावेळी डॉक्टरकडे धाव घेण्याची गरज असते.
आता वयानुसार पाहुया... महिला आणि पुरुषांमध्ये वेगवेगळा रक्तदाबाचे प्रमाण असते.
नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा बीपी हा पहिल्या महिन्यापर्यंत 60–90/20–60 या Systolic (mm Hg)/Diastolic (mm Hg) या प्रमाणात असावा.
यानंतरच्या लहान मुलांचा रक्तदाब हा 95–105/53–66 एवढा असावा, नर्सरीत जाणाऱ्या मुलांचे ब्लड प्रेशर हे 95–110/56–70 एवढे असावे.
शाळेत जाणाऱ्या मुलांचा बीपी हा 97–112/57–71 या रेंजमध्ये असावा. पौगंडावस्थेत आलेल्या मुलांचा बीपी हा 112–128/66–80 असावा.
18-39 वयोगटातील महिलांचा बीपी हा 110/68 च्या रेंजमध्ये, तर पुरुषांचा बीपी हा 119/70 या रेंजमध्ये असावा. जो की आज बहुतांश लोकांमध्ये असत नाही.
40-59 वयोगटातील महिलांचे ब्लड प्रेशर 122/74 च्या रेंजमध्ये असावे. तर या वयातील पुरुषांचा रक्तदाब हा 124/77 असावा.
साठी गाठलेल्या म्हणजेच 60+ वयाच्या महिलांचा रक्तदाब हा 139/68 या रेंजमध्ये असावा तर पुरुषांचा बीपी हा 133/69 या रेंजमध्ये असावा लागतो.