वॉशिंग मशीनमध्ये बिनधास्तपणे धुवा काळे कपडे, या ट्रीकमुळे येणार नाहीत त्यावर पांढरे गोळे

नक्की ट्राय करा या टीप्स

वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवायला टाकल्यावर अनेकदा त्याच्यावर अन्य कपड्यांचे दोरे किंवा  डाग लागतात.

अनेकदा मशीनमध्ये काळ्या रंगाचे कपडे धुवायला टाकले तर त्याच्यावर हमखास पांढऱ्या रंगाचे बारीक बारीक दोरे किंवा कापसासारखे पुंजके चिकटतात. ही समस्या दूर करण्यासाठी काही टिप्स पाहुयात.

 कपडे मशीनमध्ये धुतांना कायम उलट बाजू करुन मगच ते धुवायला टाका.

मशीनमध्ये कपडे टाकतांना शर्ट, पँटचे खिसे नक्की चेक करा. कारण, बऱ्याचदा टिश्शू पेपरचा एखादा तुकडा जरी मशीनमध्ये गेला तरीदेखील सगळ्या कपड्यांना पांढरे दोरे चिकटतात.

अतिप्रमाणत डिटर्जेंट पावडर वापरल्यामुळेही काळ्या कपड्यांवर पांढरे डाग येतात. त्यामुळे पावडर प्रमाणात टाका.

कपडे धुतांना त्यात अर्धा कप व्हिनेगर टाका.

फंगल इंफेक्शनने त्रस्त असाल तर ट्राय करा घरगुती उपाय

Click Here