असे काही पक्षी आहेत जे रात्री स्पष्टपण पाहू शकतात. पण, दिवसा त्यांना काही दिसत नाही.
निसर्गात असे काही पशुपक्षी आहेत ज्यांना रात्री स्पष्ट दिसतं. मात्र, दिवसा त्यांना अजिबातच दिसत नाही.
आज अशा काही पशूपक्ष्यांविषयी जाणून घेऊयात ज्यांना दिवसा अजिबात दिसत नाही.
घुबड- घुबडाला रात्रीच्या अंधारात सगळं स्पष्ट दिसतं हे साऱ्यांनाच ठावूक आहे. परंतु, त्याला दिवसा अजिबातच दिसत नाही.
रात्री बऱ्याचदा टिकटिक आवाज करणारा True crickets दिसून येतो. हिंदीमध्ये झिंगूर असं म्हटलं जाणारा हा किडा दिवसा गायब असतो.
वटवाघुळ - रात्रीच्या अंधारात वटवाघुळ चांगलेच अॅक्टिव्ह असतात. परंतु, दिवसा त्यांची गती मंदावते. त्यांना दिवसा काही दिसत नाही.
मासे- साधारणपणे पाण्यातील गुफेत राहणाऱ्या लहान माशांना दिवसाच्या प्रकाशात काही दिसत नाही. मात्र, रात्री ते पाण्यात छान विहार करतात.
चतूर- लहानपणी अनेकांनी चतूर पकडायचा खेळ खेळला असेल. परंतु, चतूरला दिवसा अंधूक दिसत असतं.