'बिग बॉस'च्या घरात मिळाला लाइफ पार्टनर!

मराठी अभिनेत्रीलाही 'बिग बॉस'च्या घरातच लाइफ पार्टनर मिळाला. 

'बिग बॉस' हा टीव्हीवरील अतिशय लोकप्रिय शो आहे. नेहमी वादात असणारा हा शो प्रेक्षक आवर्जुन पाहतात. 

'बिग बॉस'मध्ये आतापर्यंत अनेक जोड्या जुळल्या आहेत. मराठी अभिनेत्रीलाही 'बिग बॉस'च्या घरातच लाइफ पार्टनर मिळाला. 

अभिनेत्री अमृता देशमुख 'बिग बॉस मराठी ४'मध्ये सहभागी झाली होती. या पर्वातील ती चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होती. 

अमृतासोबत या पर्वात प्रसाद जवादेही स्पर्धक होता. 'बिग बॉस'च्या घरातच त्यांचे सूर जुळले आणि त्यांनी लग्न केलं. 

अमृता ही लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबतच एक आरजे देखील आहे. 

फ्रेशर्स मालिकेमुळे अमृताला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती मी तुझीच रे, तुमचं आमचं सेम असतं मालिकांमध्ये ती दिसली होती. 

काही सिनेमांमध्ये अमृताने काम केलं आहे. 

Click Here