भाऊबीजेला बहिणीला काय गिफ्ट द्यायचं प्रश्न पडलाय? द्या 'या' खास भेटवस्तू
यंदा तुम्ही दिलेलं गिफ्ट बहिणीला नक्कीच आवडणार
दिवाळी आली की सगळ्या भावांसमोर मोठा प्रश्न असतो ते बहिणीला नेमकं गिफ्ट काय द्यावं.
आपल्या पसंतीचं गिफ्ट आपण बहिणीला दिलं तर तिला ते आवडेल का? असा प्रश्न प्रत्येक भावाला पडतो. त्यामुळेच असे काही गिफ्ट्स पाहुयात जे तुम्ही बहिणीला दिले तर ती नक्कीच खूश होईल.
सध्या बाजारात पर्सनलाइज्ड ज्वेलरीचा बराच ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला तिचं नाव लिहिलेलं नेकपीस, ब्रेसलेट किंवा रिंग नक्कीच भेट देऊ शकता.
तुमचा बहिणीसोबत असलेला लहानपणीचा किंवा अन्य कोणताही कायम स्मरणात राहील असा फोटो किंवा अल्बम गिफ्ट करु शकता. यामुळे तुमच्या जुन्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळेल.
मेकअप करणं हा प्रत्येक स्त्रीचा वीक पॉइंट आहे. त्यामुळे तुम्ही बहिणीला स्पा किंवा ब्युटी वाऊचर भेट देऊ शकता.
तुमची बहिणी कॉलेज, ऑफिस किंवा हाऊस वाईफ असेल तर त्यानुसार तुम्ही तिला हँडबॅग, पर्स, बॅकपॅक अशा काही गोष्टी भेट देऊ शकता.
मुलांना स्वावलंबी करण्यासाठी पालकांनी फॉलो करा 'या' टिप्स