रक्तशुद्धीसाठी खा विड्याचं पान

विड्याचं पान खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत.

पूर्वीच्या काळी जेवण झालं की लोक आवर्जुन विड्याचं पान खायचे. आजही अनेक घरात वयस्क व्यक्ती पानाचा विडा करुन खातात.

विड्याचं पान खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. हे फायदे कोणते ते पाहुयात.

विड्याचं पान खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते. परिणामी, अपचन होणे, पोटफुगी होणे यांसारख्या समस्या दूर होतात.

विड्याचं पान खाल्ल्यामुळे तोंडात लाळेची निर्मिती होते. ज्यामुळे तोंड स्वच्छ राहण्यास मदत मिळते. तसंच तोंडातील जीवाणूंचा नाश होतो आणि तोंडाची दुर्गंधी दूर होते.

विड्याच्या पानातील अँटीऑक्सिडंट्स रक्तशुद्धीकरणास मदत करतात. ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात.

विड्याचं पान सर्दी, खोकला यांसारख्या समस्यांवर आराम देते. विड्याचं पान पाण्यात छान उकळून त्याचा काढा करावा. हा काढा घेतल्यास श्वसनमार्गातील अडथळे दूर होतात.

विड्याच्या पानातील अँटीसेप्टिक गुणधर्मांमुळे जखमा भरून येण्यास मदत होते. पानाचा रस लावल्याने त्वचेच्या इजा लवकर भरून येतात.

युरीन इन्फेक्शन टाळण्यासाठी घ्या खबरदारी

Click Here