ब्रोकोली खाण्याची 'हीच' योग्य पद्धत! चुकीची पद्धत - 'झिरो पोषण'...

अनेकजण ब्रोकोली घरी आणतात, पण खरी अडचण येते ती शिजवताना! कित्येकांना ती नेमकी कशी खावी किंवा कशी शिजवावी हे समजत नाही.


दिसायला फ्लॉवरसारखी पण गडद हिरव्या रंगाची ही ब्रोकोली व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबरचा खजिना मानली जाते.

चुकीच्या पद्धतीने शिजवल्यामुळे ब्रोकोलीतील पोषक तत्वे नष्ट होतात आणि तिची चवही बिघडते.

प्रत्यक्षात ब्रोकोली खाण्याची योग्य पद्धत माहीत असेल, तर तिचे सर्व पोषक फायदे शरीराला मिळू शकतात.

अनेकजण ब्रोकोली खूप वेळ शिजवतात किंवा तेलात जास्त फ्राय करतात. यामुळे त्यातील कॅन्सरशी लढणारे घटक आणि व्हिटॅमिन्स नष्ट होतात.

ब्रोकोलीमध्ये लहान कीड असू शकतात. त्यामुळे ती चिरण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून ५ ते १० मिनिटे ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

ब्रोकोली शिजवण्याची सर्वात उत्तम पद्धत म्हणजे ती फक्त ५ मिनिटे वाफवून घेणे. यामुळे तिचा हिरवा रंग आणि पोषक तत्वे दोन्ही टिकून राहतात.

ब्रोकोली पाण्यात उकळल्यास त्यातील व्हिटॅमिन सी आणि बी-कॉम्प्लेक्स पाण्यात निघून जातात. जर उकळायचेच असेल, तर ते पाणी सूपमध्ये वापरा.

अनेकजण फक्त ब्रोकोलीची फुले खातात आणि देठ फेकून देतात. खरं तर, देठामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. ते बारीक चिरून सूप किंवा भाजीमध्ये नक्की वापरा.

सॅलडमध्ये कच्ची ब्रोकोली खाऊ शकता. पण ज्यांना पचनाचा त्रास आहे किंवा थायरॉईड आहे, त्यांनी ती हलकी वाफवूनच खावी.

वाफवलेल्या ब्रोकोलीवर थोडे ऑलिव्ह ऑईल, मिरी पूड आणि लिंबाचा रस टाकल्यास ती अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक लागते.

Click Here