चांगल्या प्रकारे काम करणं म्हणजे सर्व गोष्टांना हो म्हणणं नाही.
जर एखादं काम दिलेल्या वेळेत पूर्ण करणं अशक्यप्राय गोष्ट असेल तर तुम्ही त्या कामाला नाही म्हणू शकता.
जर एखादा प्रोजेक्ट तुम्हाला साजेसा नाहीये तर तुम्ही त्यासाठी दुसऱ्याचं नाव सुचवू शकता.
तुम्ही स्वतःसाठी किंवा एखाद्या कंपनीसाठी जरी काम करत असली तरी तुम्हाला सहकाऱ्याची गरज असते.
तुम्ही कामाच्या ताणाबाबत कुटुंब, मित्र किंवा सहकाऱ्यांशी याबाबत बोलू शकता.
तुम्हाला कामाचा ताण मॅनेज करण्यासाठी मेंटल हेल्थ एक्सपर्ट देखील मदत करू शकतात.
दिवसातून १० ते १५ मिनिटं ही चालण्यासाठी, स्ट्रेचिंग करण्यासाठी किंवा नृत्यासाठी द्या.