ॲपल साईड व्हिनेगर आणि पाणी सम प्रमाणात एकत्र करून केसांच्या मुळाशी लावा आणि अर्ध्या तासाने केस धुवून टाका. डोक्यातला कोंडा खूप कमी होईल..
मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत घाला. दुसऱ्यादिवशी सकाळी त्यांची पेस्ट करा. त्यात थोडं दही घालून हा हेअर मास्क केसांना लावा. अर्ध्या तासाने केस धुवून टाका.
टी ट्री ऑईल ॲण्टी फंगल, ॲण्टी बॅक्टेरियल असते. या तेलाचे ४ ते ५ थेंब तुमच्या शाम्पूमध्ये घाला आणि त्याने केस धुवा. कोंडा कमी होईल.