वाढलेलं वजन, वार्धक्य किंवा अन्य काही कारणांमुळे अनेकांना गुडघेदुखीची समस्या निर्माण होते.
बऱ्याचदा डॉक्टरी उपाय केल्यानंतरही ही समस्या काही दूर होत नाही. म्हणूनच, गुडघेदुखी थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय पाहुयात.
गुडघे सतत दुखत असतील तर दररोज रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या दुधाचं सेवन करावं. यासाठी गाईच्या दुधात हळद आणि तूप मिक्स करावं आणि त्याचं सेवन करावं.
रात्रभर मेथीचे दाणे पाण्यात भिजवावेत. त्यानंतर सकाळी भिजलेले मेथीदाणे चावून खावेत. किंवा, कोरडे करुन त्याची पूड करुन खावी. मेथीमुळे हाडे बळकट होतात. व सूज, वेदना कमी होतात.
नारळाचं तेल गरम करुन त्यात हिंग आणि लसूण मिक्स करावं. त्यानंतर हे तेल कोमट झाल्यावर त्याने गुडघ्यांची मालिश करावी.
गुडघेदुखीसाठी दररोज वज्रासन, पवनमुक्तासन, तितली आसन यांसारखी हलकी योगासने करावीत. तसेच २० मिनिटे दररोज चालावं.