कंबरदुखीने त्रस्त आहात? करा हे सोपे घरगुती उपाय

हिवाळ्यात कंबरदुखीचा त्रास जास्तच जाणवतो. 

व्यायामाचा अभाव, बसण्याची चुकीची पद्धत वा एखादी शारीरिक व्याधी यामुळे अनेक जणांना कंबरदुखीची समस्या जाणवते.

हिवाळ्यात कंबरदुखीचा त्रास जास्तच जाणवतो. म्हणूनच, हा त्रास कमी करण्याचे उपाय पाहुयात.

कंबर जास्तच दुखत असेल तर नारळाच्या तेलात ५-६ लसूण पाकळ्या टाका. हे तेल गरम करा. त्यानंतर तेल कोमट असतांनाच त्याने कंबरेवर मालिश करा.

गरम पाण्यात मीठ टाका. या मीठाच्या पाण्यात कापड भिजवून चांगलं पिळून घ्या. आणि, या कापडाने कंबरेला शेक द्या.

बराच काळ एका ठिकाणी बसून काम करु नका. दर १५ मिनिटांनी कामातून ब्रेक घ्या आणि,जागेवरुन उठा. यात शरीर स्ट्रेच करा, वॉक करा. यामुळे कंबरेला आराम मिळेल.

आहारात कॅल्शिअमयुक्त पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करा.

कापूर आहे बहुगुणी, 'या' शारीरिक समस्या होतील झटक्यात दूर

Click Here