weight loss साठी सर्वात उत्तम exercise कोणते? 

बदलत्या जीवनशैलीत वाढतं वजन हा एक युनिव्हर्सल प्रॉब्लेम झाला आहे. 

बदलत्या जीवनशैलीत वाढतं वजन हा एक युनिव्हर्सल प्रॉब्लेम झाला आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक व्यायाम आहेत मात्र प्रभावी कोणता हे जाणून घेऊयात.

चालणे हा सहज आणि कमी ताकद लावता करण्याचा व्यायाम प्रकार आहे. रोज ३०-६० मिनिटे चालण्याने वजन कमी होण्यास मदत करते.

जॉगिंग केल्यानं चालण्यापेक्षा जास्त कॅलरी बर्न होतात. सुरुवातीला हळूहळू जॉगिंग सुरू करा आणि हळूहळू वेळ आणि वेग वाढवा.

सायकलिंगमुळं सांध्यांना त्रास न देता चांगल्या प्रकारे कॅलरी बर्न होते. प्रती तास ४०० ते ७५० कॅलरी कमी होण्यास मदत होते. मात्र हे सर्व गती आणि वजनावर अवलंबून आहे.

पोहण्यानं संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो तसंच सांध्यावर ताण देखील कमी पडतो. कॅलरी बर्न करण्यासाठी पोहण्याचा व्यायाम उत्कृष्ट आहे.

थोड्या वेळासाठी इन्टेन्स व्यायाम आणि मग विश्रांती असा प्रकारचे व्यायाम केल्यानं लवकर कॅलरी बर्न होते आणि व्यायामानंतरही कॅलरी कमी होण्यास मदत होते.

वेट ट्रेनिंगमुळं स्नायूंची तादक अन् आकार वाढवतो, ज्यामुळे दिवसभर जास्त कॅलरी खर्च होते.

योग आणि पिलाटिस व्यायामानं भारी कॅलरी बर्न करत नाही, पण वाढलेलं पोट कमी करायला मदत होते, लवचिकता वाढवाते मानसिक आरोग्य सुधारतं.

Click Here