बैठं काम बदलत्या जीवनशैलीचं एक वैशिष्ट आहे. मात्र ते पाठ दुखीला देखील निमंत्रण देतं.
चालणे: नियमितपणे चालल्याने पाठीच्या स्नायूंना बळ मिळतो आणि रक्तसंचार सुधारतो.
सौम्य योग : पर्वतासन, बालासन, मलासन यांसारखी योगासने पाठीला आराम देतात.
Pelvic Tilt Exercise: पाठीवर झोपून गुडघे वाकवून कमर हळूवारपणे वर उचलणे.
Hamstring Stretch : पाठीवर झोपून गुडघा छातीकडे वाकवणे आणि त्याला हाताने पकडून थोडा ताण देणे.
Pelvic Rotation Exercise : पाठीवर झोपून गुडघे साइडकडे वळवणे, छाती आणि डोक्याचा भाग सरळ ठेवणे.
Kneeling Forward Bending Exercise : वज्रासनात बसून हात पुढे सरकत पाठीतून वाकणे.
Prone Extension Exercise : पालथं झोपून हात बाजूला ठेऊन का-यावर वजन देत शरीर सावरून येणे.
Cat-Cow Stretch : चार पायांवरून पाठीचा वक्र बदलणे, उंचावणे आणि खाली आणणे, ज्याने पाठीची लवचिकता वाढते.