युरिक अ‍ॅसिडचा त्रास होत असल्यास ‘हा’ सुका मेवा करेल तुमची मदत

सांधे व किडनीच्या आजारांपासून राहाल लांब

युरिक अ‍ॅसिड हे शरीरातील घातक टॉक्सिन असून त्याचा सर्वाधिक फटका किडनीला बसतो. किडनीची कार्यक्षमता मंदावल्यास युरिक अ‍ॅसिडचे रूपांतर क्रिस्टल्समध्ये होते, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका निर्माण होतो.

प्युरीनयुक्त पदार्थ (विशेषतः मांस आणि मद्य) अतिसेवनामुळे युरिक ॲसिड वाढते. हे ॲसिड सांध्यांमध्ये जमा झाल्याने संधिवाताचा त्रास सुरू होतो, ज्यामुळे शरीरात तीव्र वेदना होऊ शकतात.

युरिक ॲसिड कमी करण्यासाठी नेहमी औषधे घेण्याचा कंटाळा येत असेल, तर काही ड्रायफ्रूट्स उत्तम पर्याय ठरू शकतात. हे ड्रायफ्रूट्स सांध्यांचे आरोग्य सुधारण्यासोबतच युरिक ॲसिडची पातळी नैसर्गिकरीत्या नियंत्रित करण्यास मदत करतात.

बदाम: युरिक ॲसिडच्या रुग्णांसाठी बदाम अत्यंत फायदेशीर आहेत. यात मॅग्नेशियम आणि वनस्पतीजन्य प्रथिने असल्याने सांध्यातील सूज कमी होते. महत्त्वाचे म्हणजे बदामात प्युरिनचे प्रमाण कमी असल्याने ते युरिक ॲसिड नियंत्रित ठेवण्यास आणि हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

अक्रोड: ओमेगा-३ फॅटी ॲसिडने समृद्ध असलेले अक्रोड सांध्यातील कडकपणा आणि सूज कमी करण्यास मदत करतात. यात प्युरिनचे प्रमाण कमी असल्याने शरीरात युरिक ॲसिडची निर्मिती वाढत नाही.

पिस्ता: पिस्तामधील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन बी६ सांध्यांचे आरोग्य सुधारतात. यामुळे किडनीची कार्यक्षमता वाढते, परिणामी शरीरातील अतिरिक्त युरिक ॲसिड बाहेर टाकण्यास मोठी मदत होते.

काजू: मॅग्नेशियम आणि झिंकसारख्या खनिजांमुळे काजू सांध्यांची लवचिकता वाढवतात. यात प्युरीनचे प्रमाण मध्यम असते, जे शरीरातील जळजळ कमी करून युरिक ॲसिडच्या चयापचयात (Metabolism) मदत करतात.

खजूर: पोटॅशियमने समृद्ध असलेले खजूर शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखतात आणि युरिक ॲसिड साठण्यापासून रोखतात. यातील अँटीऑक्सिडंट्स सांध्यांच्या उतींचे (Tissues) नुकसान टाळून त्यांचे संरक्षण करतात.

Click Here