ज्या व्यक्तींना हृदयाशी निगडीत समस्या किंवा आजार आहेत त्यांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
हार्ट पेशंटने कोणत्या प्रकारच्या तेलाचं सेवन करायला हवं ते पाहुयात.
सध्या बाजारात अनेक प्रकारची खाद्यतेल उपलब्ध आहेत. मात्र, त्यात हार्ट पेशंटसाठी उपयुक्त कोणतं ते पाहुयात.
हार्ट पेशंटसाठी सरसो का तेल म्हणजेच मोहरीचं तेल उत्तम असल्याचं म्हटलं जातं.
या तेलात ओमेगा -3 फॅटी अॅसिड असतं जे हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतं.
ऑलिव्ह ऑईल आणि तिळाचं तेल सुद्धा हार्ट पेशंटसाठी वापरता येऊ शकतात.