उन्हाळ्यातही दिसा 'कूल' आणि 'स्टायलिश' 'या' रंगांच्या कपड्यांमुळे उष्णतेपासून मिळेल आराम...
नुसतं कॉटन असून चालणार नाही! कपड्यांच्या रंगांची ही 'स्मार्ट' निवड तुम्हाला उन्हाळ्यात देईल सुखद अनुभव.
उन्हाळा आला की घाम आणि उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होते. अशावेळी शरीराला थंडावा देणारे आणि डोळ्यांना सुखद वाटणारे रंग निवडणे खूप महत्त्वाचे असते.
उन्हाळ्यात गडद रंग उष्णता शोषून घेतात, तर फिकट रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतात. त्यामुळे योग्य रंग निवडल्यास शरीर थंड राहते.
पांढरा रंग उन्हाळ्यासाठी सर्वात उत्तम मानला जातो. हा रंग उष्णता शोषत नाही आणि तुम्हाला एक अतिशय 'क्लीन' आणि 'एलिगंट' लूक देतो.
निळा रंग डोळ्यांना थंडावा देतो. आकाशी किंवा फिकट निळ्या रंगाचे सुती कपडे उन्हाळ्यासाठी परफेक्ट आहेत.
हिरव्या रंगाची 'पेस्टल शेड' म्हणजेच मिंट ग्रीन सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. हा रंग तुम्हाला ताजेतवाने आणि निसर्गाच्या जवळ असल्याचा फील देतो.
गुलाबी आणि पीच रंगाच्या फिकट छटा केवळ सौंदर्यात भर घालत नाहीत, तर यामुळे उन्हाचा चटकाही कमी जाणवतो.
उन्हाळ्यात गडद पिवळ्याऐवजी फिकट पिवळा किंवा 'लेमन यलो' निवडा. हा रंग उत्साह वाढवणारा आणि उन्हाळ्याच्या वातावरणाला साजेसा असतो.
जर तुम्हाला काहीतरी हटके ट्राय करायचे असेल, तर लॅव्हेंडर रंग निवडा. हा रंग सध्या खूप लोकप्रिय आहे आणि कूल लूक देतो.
केवळ रंगच नाही, तर कपड्यांचे मटेरियलही महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात नेहमी सुती किंवा लिनन कपड्यांचीच निवड करा.