मुलतानी मातीपुढे महागडे फेसपॅकही पडतील फिके, जाणून घ्या फायदे

मुलतानी मातीने मिळवा चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो

सणवार आले की प्रत्येक स्त्रीची पावलं आपोआप ब्युटीपार्लरच्या दिशेने वळतात.

चेहऱ्यावर ग्लो यावा यासाठी अनेक स्त्रिया वेगवेगळे फेसपॅक चेहऱ्यावर लावतात. किंवा, अन्य काही ट्रिटमेंट करतात.

दिवाळीच्या दिवसात जर तुम्हाला चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणायचा असेल तर त्यासाठी कोणत्याही महागड्या फेसपॅकची गरज नाही. अगदी स्वस्तात मिळणाऱ्या मुलतानी मातीमुळेही तुमचं काम होईल.

दिवाळीत चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येण्यासाठी मुलतानी माती कशी फायदेशीर आहे ते पाहुयात.

मुलतानी माती व गुलाबपाणी एकत्र करून लावल्यास चेहऱ्यावर डाग, मुरूम कमी होण्यास मदत मिळते.

मुलतानी माती चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचेत ओलावा निर्माण होते.त्यामुळे दिवसभर तुमची स्कीन हायड्रेट राहते.

मुलतानी माती लावल्यामुळे त्वचेचे टॅनिंग दूर होते व त्वचा तजेलदार होते.

साध्या लूकमध्ये सुंदर दिसते नम्रता

Click Here