रिकाम्यापोटी प्या पुदिन्याचं पाणी, वाढलेलं पोट जाईल आत
शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यासाठी पुदिन्याचं पाणी हा बेस्ट पर्याय आहे.
सध्याच्या काळात अनेक जण वाढलेलं वजन आणि स्थूलता या समस्येने त्रस्त आहेत. अनेकदा डॉक्टरी उपाय केल्यानंतरही या समस्येवर तोडगा मिळत नाही.
वाढलेलं वजन कमी करण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात आणि आहारात काही किरकोळ बदल करणं गरजेचं आहे.
शरीरातील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यासाठी पुदिन्याचं पाणी हा बेस्ट पर्याय आहे. पुदिन्याचं पाणी प्यायल्यामुळे शरीरातील फॅट कमी होतंच. सोबतच त्याचे अन्यही काही फायदे आहेत.
पुदिन्याचं पाणी प्यायल्यामुळे लिव्हर आणि कि़डनी डिटॉक्स होतं.
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी सकाळी उपाशीपोटी पुदिन्याचं पाणी प्यावं.
एका बाटलीत पुदिन्याची पानं घेऊन त्यात पाणी टाका. हे पाणी रात्रभर तसंच ठेवा आणि सकाळी प्या. किंवा, पुदिन्याच्या पानांची पेस्ट करुन ती पेस्ट पाण्यात मिक्स करुन ते पाणी सुद्धा तुम्ही पिऊ शकता.
पुदिन्याचं पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. ज्यामुळे गॅस, अपचन या समस्या दूर होतात.